Raj tried Swav's this recipe
Whole wheat Roasted Sevai - Bambino or MTR brand is good.
भांड्यात तेलावर फोडणी यात : उडीद डाळ, मोहोरी, हिरवी मिरची तुकडे + कढीपत्ता
फोडणीवर कांदा लालसर परतून घ्यायचा
मग पाणी घालायचे आणि उकळायचे ( अंदाजे पाणी तुमची फोडणी, भाज्या - ज्या मी तरी पाणी उकळायला सुरूवात झाल्यावर घालते - आणि अख्ख पाकीट शेवया, या सगळ्याला मिळून एक लीटर पेक्षा कमी पाणी लागेल )
पाणी आधीच खूप घालायचं नाही, जर कमी पडतंय वाटलं तर वाढवायचं
पाणी उकळायला लागल्यावर त्यात टोमॅटो, भोपळी मिरची - पिवळी / हिरवी / लाल चे छोटे तुकडे, चवीनुसार मीठ घालायचं.
हे सगळं उकळायला लागलं खळखळून की त्यात शेवया घालायच्या, हे नीट उकळलं की त्यात हिरवे वाटाणे - ते पट्कन शिजतात म्हणून शेवटी टाकते मी.
आता जरा तिखट - मीठ बघायचं
जर मीठ जास्त झालं असेल तर साखर किंवा ओला नारळ घालायचा
या मिश्रणाला भरपूर उकळी यायला लागली की - शेवया शिजायला लागल्यायत पण सगळ्या भाज्या त्या पाण्यात नीट फिरतात, उकळत असल्याने
अशा वेळी भांड्यावर झाकण ठेऊन, अगदी मंद आचेवर 6-7 मिनीटे शांत शिजू द्यायचं, सारखं हलवायचं नाही
मंद आचेवर ठेवल्याने भाजलेल्या शेवया नीट शिजतात, पाणी शोषून घेतात पण लगदा न होता मोकळ्या रहातात
गॅस बंद केल्यावर पण एकदा नीट हलून घ्यायचं जरा वाफ निघून जाऊ द्यायची
गॅसवरून काढल्यावर परत 5- 6 मिनिटं तसंच नीट झाकण लावून ठेवायचं
नंतर खायचं पटापट किंवा डब्यात भरायचं
कधी कधी यात हिरवे वाटाणे घालायच्या ऐवजी मशरूम किंवा boneless chicken चे छोटे तुकडे पण घालते मी , खूप मस्त चवीचं आणि एकदम nutricious पदार्थ 15 मिनिटात करता येतो , भाज्या कापायला कदाचित अजून 5-6 मिनिटं लागतील कदाचित

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.