Friday, December 15, 2017

Archus Kolhapuri Kut Vada

Source - Whatsapp

झणझणीत अस्सल कोल्हापुरी कट वडा

वड्यासाठी साहित्य : चार उकडलेले बटाटे, वाटीभर चिरलेला कांदा, चवीनुसार ३-४ हिरव्या मिरच्या, ७-८ कढीपत्त्याची पाने  ,एक छोटा चमचा  हळद, मूठभर चिरलेली कोथींबीर. एक चमचा आले-लसणाची पेस्ट, फोडणीसाठी- तेल, हिंग, जीरे, मोहरी.
पारी/आवरणासाठी : एक वाटी बेसन पीठ,हिंग,जीरे, तिखट, मिठ, थोडी बारीक चिरलेली कोथींबीर, कढीपत्त्याची पाने, चमचाभर मोहन.
तळायला आवश्यकतेनुसार तेल.
कृती : उकडलेल्या बटाट्याचे बारिक तुकडे करुन घेऊन त्यात गॅसवर एका कढईत कांद्याची जीर,मोहरी,हिंग, कढीपत्ता, मिरच्या घालुन केलेली तडका फोडणी मिसळा. चवीनुसार मिठ घाला. आता या मिश्रणात आले-लसणाची ची पेस्ट मिसळा. या मिश्रणाचे लिंबाएव्हढे अथवा त्यापेक्षा मोठे गोळे बनवून ठेवा.
आवरणाच्या साहित्यात पाणी मिसळुन भजीच्या पिठासारखे घट्टसर भिजवा. वडे तळायला ठेवलेल्या तेलातले थोडे तेल यावर मोहन म्हणून घाला.
गॅसवर एका काढीत वडे टाळण्यासाठी तेल गरम करा अन घ्या तळुन वडे!
काटासाठीचे साहित्य : एक वाटी कांद्याची पेस्ट,एक वाटी टोमॅटो पेस्ट / प्यूरी,एक वाटी ओल्या खोबर्याचा चव,एक वाटी फरसाणतली पापडी अथवा गाठी यांचा चुरा, एक वाटी मॅश केलेली बटाटा भाजी , एक तमालपत्र,४ लवंगा,पेरभर  दालचिनिचा तुकडा,एक टेबलस्पून लसूण पेस्ट,चवीनुसार मिठ, लाल मिरचीचे  तिखट, दोन आमसुले.
कृती गॅसवर एका पॅनमध्ये थोड्याश्या तेलात तमालपत्र,लवंगा,दालचिनी परतून घ्या त्यावर कांदा पेस्ट घालुन कच्चा वास जाईपर्यंत परता, आता त्यात ओल्या खोबर्यार्यापचा चव घालुन परता.मग टोमॅटो पेस्ट/प्यूरी घालुन माध्यम आंचेवर शिजवुन घ्या.
हे सगळ मिश्रण मिक्सर ग्राइंडरवर फिरवुन छान बारीक वाटुन घ्या. त्यातच बटाट्याची भाजी अन पापडी अथवा गाठीचा चुरा मिसळा.
आता गॅसवर एका जाड बुडाच्या मोठ्या पॅनमध्ये जरा जास्त तेल घ्या. तेल तापून धूर येऊ लागला की गॅस बंद करा, तेल किंचीत तापमानाला उतरल की त्यात लाल मिरचीचे तिखट घाला. जळु देउ नका! भरभर पळीने हलवत रहा. आता त्यात वरील पेस्ट घालुन पुन्हा गॅस सुरु करा. पाहिजे तेव्हढ पाणी, मिठ आणि आमसुले घाला. चांगल उकळा.झाला झणझणीत तर्रीचा कट तय्यार.
सर्व्हिंग डिशमध्ये दोन वडे घालून त्यावर लाल भडक तर्री आलेला कट ओटा आणि वर पसरायला फरसाण,बारी चिरलेली कोथिंबीर आणि कांदा घाला व थोडसा ओल्या खोबर्याणचा चव पसरा अन लिंबाची फोड घालून सर्व्ह करा!

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.