Source - Whatsapp
ऐन वेळी नाश्त्यासाठी झटपट बनू शकतील असे हे खमंग व कुरकुरीत पोहयांचे वडे घारातल्या सर्वांनाच नक्कीच आवडतील यात शंकाच नको.
साहित्य : २-३ वाट्या जाड पोहे,दोन चमचे हिरव्या मिरचीचा ठेचा,दोनटेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, दोन चमचे लिंबाचा रस,अर्धा छोटा चमचा हळद, चवीनुसार मीठ,छोटा चमचा जिरे पूड,छोटा चमचा लाल मिरचीचे तिखट,बारीक चिरलेला कांदा व पालकाची पाने आणि तळणीसाठी गरजेनुसार तेल.
कृती : पंधरा मिनिटे आगोदर २-३ वाट्या जाड पोहे पाण्यात भिजत घालून ठेवा. एका मोठ्या बाउलमध्ये हे भिजवलेले जाड पोहे मळून घ्या,मळत असतांना त्यात चवीनुसार हिरव्या मिरचीचा ठेचा, बारीक चिरलेली कोथिंबीर, लिंबाचा रस, हळद, चवीनुसार मीठ, जिरे पूड, लाल मिरचीचे तिखट,बारीक चिरलेला कांदा व पालकाची पाने घालून एकजीव मिसळून व मळून घ्या.
या मिश्रणाचे छोटे छोटे गोल आकारातले चपटे वडे बनवून घेऊन गॅसवर एका कढईत तेल गरम करून घेऊन त्या गरम तेलात हे वडे टाळून घ्या.
कोणत्याही हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.