Source- WhatsApp
शेपूचे खमंग वडे
साहित्य : दोन वाट्या स्वच्छ धुवून व निवडून घेऊन बारीक चिरलेला शेपू,एक वाटी बेसनाचे पिठ,दोन टेबलस्पून तांदुळाची पिठी,एक मोठा बारीक चिरलेला कांदा,एक टेबलस्पून आले-लसूण पेस्ट,एक चमचा हळद, चवीनुसार मिरची पावडर व मीठ,चार टेबलस्पून पांढरे तीळ,तळण्यासाठी आवश्यकतेनुसार तेल.कृती : एका मोठ्या परातीमध्ये बारीक चिरलेला शेपू, बेसनाचे पिठ, तांदुळाची पिठी,बारीक चिरलेला कांदा, आले-लसून पेस्ट, हळद, मीठ, मिरची पावडर आणि पांढरे तीळ एकत्र करून पाणी घालून पिठ मळून घ्यावे.
छोटे छोटे गोल गोळे करून त्यांना वड्यांचा आकार देऊन वरून तीळ लावावे आणि खमंग तळून किंवा शॅलो फ्राय करून घ्यावे.
टोमॅटो सॉस किंवा खजूर चटणीबरोबर हे गरम शेपूचे खमंग वडे सर्व्ह करावे
Su tried these Shepu Vade
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.