Tuesday, December 19, 2017

Piku's Kolambi Bhat


कोलंबी भात
कोलंबीला आलं, लसूण, कोथिंबीर, १ मिरचीच वाटण आणि आमसूल किंवा लिंबू लावून ठेवायचं. तांदूळ अर्धा तास आधी भिजवून ठेवायचा. शक्यतो बासमती किंवा दिल्ली राईस घ्यावा.

तेलात उभा चिरलेला कांदा टाकायचा. त्यात आलं लसूण कोथिंबीर मिरचीचं वाटणं, १ चमचा घालून परतायचं. कांदा चांगला परतला की कोलंबी घालायची. त्यात तांदळाच्या अंदाजाने मसाला हळद घालायची. परतून २ मिनीटं झाकण ठेव. तांदळाचं पाणी पूर्ण काढून टाकून तांदूळ टाकावे. त्यावर मोठा चमचा तूप घालून परतायचं. मीठ घालं तांदळाच्या अंदाजाने. जेवढे वाटी तांदूळ त्याच्या दुप्पट नारळाचे दूध घालून ढवळून झाकण ठेवावे. कुकरमध्ये किंवा प्रेशरपॅन मधे नको करू.  इलेक्ट्रिक कूकर चालेल. त्याला thermostat  असतो.

कोलंबीला मीठ पण लावायचं ते विसरले.

कोलंबी परतताना त्यात लिंबू पिळ म्हणजे भातालाही लागेल किंवा नंतर घेतलं तरी चालतं.

धणे जिर्याची पूड घातली तरी चालते हं. तिखटपणा झोंबत नाही मग. वरून कोथिंबीर.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.