Saturday, February 10, 2018

Amu's Paneer

कांदा, टोमॅटो,आलं, लसूण यांची mixer मध्ये ग्रेव्ही करून घ्यावी. खसखस भाजून तिची पूड करून घ्यावी. काजूची पूड करून घ्यावी. (ह्या दोन्ही गोष्टी आजच्या भाजीत घातल्या नव्हत्या ☺️)

एका कढईत/ fry pan मध्ये साजुक तूप किंवा लोणी तापवून त्यात हिंग, आवडत असल्यास थोडी कसुरी मेथी परतून घ्यावी. त्यांनतर त्यात कांदा टोमॅटो आलं लसूण ग्रेव्ही परतून घ्यावी. त्यात हळद, चवीप्रमाणे तिखट, मीठ, थोडा गरम मसाला, थोडासा किचन किंग मसाला (optional) घालावा. वाफ आल्यावर त्यात पनीरचे तुकडे घालून 1 - 2 मिनिटे वाफवावेत आणि त्यावर थोडे दूध / थोडी साय घालून गॅस बंद करावा.

** वरील पाककृतीत वाटल्यास फोडणीत मटार किंवा/आणि सिमला मिरची घालता येईल. त्यापुढील कृती वर दिलेलीच.
**  काहींना आलं फारसं आवडत नाही. आवडत नसल्यास ग्रेव्ही फक्त कांदा, लसूण, टोमॅटोची करावी.
** ज्यांना लसणाच्या फोडणीची चव आवडत असेल त्यांनी तूप/लोण्यावर ठेचलेला लसूण परतून घ्यावा.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.