Saturday, February 10, 2018

Piku's Chatpata Paneer

हळद लाल तिखट, आलं लसूण पेस्ट, मीठ, गरम मसाला, धणे जिरे पावडर, दही (थोडं जास्त), हे सगळं नीट पनीरला लावून मॅरीनेशन करून ठेवावं.

अमूल बटर वर कांदा (मिक्सरमध्ये वाटून) परतून घ्यायचा. त्यात थोडी आलं लसूण पेस्ट घालायची. चिरलेला किंवा वाटलेला टॉमेटो घालायचा. त्यात मॅरिनेट केलेलं पनीर टाकायचं. चमचाभर टॉमेटो सॉस, चमचाभर (किंवा आवडीनुसार) चिली सॉस घालायचा. पाणी घालून झाकण ठेवून वाफ आणावी. थोडीशी घट्टसर ग्रेव्ही ठेवायची. मस्त लागतं फुलक्या बरोबर किंवा पुरी बरोबर.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.