साहित्य : चार ब्रेडचे स्लाइस,दोन टेबलस्पून क्रिमी चीज /मेयॉंनीज सॉस,४-५ लसणाच्या पाकळ्यांची पेस्ट,मिरी पावडर,२-३ टेबलस्पून अमूल बटर,चवीनुसार मीठ. टोस्टला वरून लावण्यासाठी कोणतेही एखादे सॉस.
कृती : एका काचेच्या बाउलमध्ये चीज,लसूण पेस्ट,काळी मिरी पूड,मीठ हे सगळे एकत्र कालवून बाजूला ठेवून द्या.
एक ब्रेड स्लाइस घ्या व त्याच्या एका बाजूलासुरीने हे काचेच्या बाउलमध्ये तयार करून ठेवलेले मिश्रण लावा. दुसर्या बाजूला आमुलचे बटर लावा,आणि गॅसवर एक फ्राय पॅन गरम करून त्यावर अमूलचे बटर लावलेली स्लाइसची बाजू ठेऊन ३-४ मिनिटे भाजून घ्या .(मायक्रोवेव्ह मध्ये ग्रीलवर ९०० वॅट वर ३-४ मिनिटे ठेवले तरी चालेल)
टोस्ट गरम असतांनाच त्यावर कोणतेही सॉस लावून सर्व्ह करा.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.