Friday, December 15, 2017

Archus Palak Raita



Source - WhatsApp

पालक रायता
साहित्य : एक जुड्डी पालक,चार वाट्या दही,दोन चमचे जिरे पूड ,एक चमचा लाल मिरचीचे तिखट,१-२ हिरव्या मिरच्या,चवीनुसार मीठ,अर्धा चमचा मोहरी,एक चमचा तेल.
कृती : एका बाउलमध्ये दही,लाल मिरचीचे तिखट,चवीनुसार मीठ  आणि जिरेपूड एकत्र घेऊन चमच्याने नीट कालवून एकजीव करून व एग बिटरने घुसळून मिक्स करून घेऊन फ्रीजमध्ये ठेवा.
एका दुसर्‍या बाउलमध्ये मिठाच्या पाण्यात  निवडलेली पालकाची पाने घालून वाफवून/उकडून ठेवा. वाफावलेल्या/उकडलेल्या पालकाच्या पानांची मिक्सरवर प्यूरी करून घ्या. आता हे पालकाची प्यूरी बिटरने फेटून ठेवलेल्या दह्यात घाला व ढवळून मिक्स करा.
आता गॅसवर एका काढल्यात तेल गरम करून घेऊन त्यात मोहरी घाला व ती चांगली तडतडली की ती गरम फोडणी दही-पालकच्या मिश्रणावर ओता.
कालवून घ्या, व हा पालक रायता सर्व्ह करा.

Raj tried this recipe

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.