Friday, December 15, 2017

Archus Paratlela Palak

Raj tried this recipe


परतलेला पालक
साहित्य : एक जुड्डी पालक,दोन टेबलस्पून शेंगदाण्याचे कूट,चवीनुसार १-२ हिरव्या मिरच्या,एक कांदा ,१०-१२ लसणाच्या पाकळ्या,दोन चमचे तेल,एक छोटा चमचा हळद,एक चमचा मोहरी,चिमूटभर हिंग, चवीनुसार मिठ.
कृती : पालक निवडून स्वच्छ धुवुन आणि बारिक चिरुन घ्या,शेंगदाणे भट्टीवरून भाजून आणून  कुट करुन घ्या ,एका कढई मद्धे दोन चमचे तेलात ठेचलेला लसुन,मोहरी,हिंग यांची फोडणी द्या त्यातच बारीक चिरलेली मिरची घालून परता वरुन बारिक चिरलेला कांदा आणि पालक टाकुन परता नंतर शेंगदाण्याचे कुट ,हळद , मिठ घालून परता.  भाकरी कणवा चपाती बरोबर सर्व्ह करा छान लागते.
झटपट होते त्यामुळे टिफीन साठी मस्त.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.