साहित्य : एक वाटी मक्याचे पीठ, एक वाटी साखर , तीन ते चार चमचे साजूक तुप , लिंबाची एक फोड / चमचाभर रस , काजू-बदाम काप , वेलची पावडर, खाद्य रंग.
कृती - एका बाऊलमध्ये एक वाटी मक्याचे पीठ व त्याच्या दुप्पट पाणी हळू हळू घालत गुठळी न होवू देता छान पेस्ट करुन घ्यावी. नंतर जड बुडाच्या नॉनस्टिक पॅन मध्ये एक वाटी साखरेत दीड वाटी पाणी घालून उकळत ठेवावे , साखर पूर्ण विरघळली की, त्यात कॉर्न पेस्ट हळू हळू मिसळावी , मिसळतानना सतत ढवळत रहावे म्हणजे गुठळी होणार नाही.मिश्रण घट्ट होत आले की, त्यात लिंबाचा रस मिसळावा .आणि ते मिश्रण पारदर्शक व्हायला लागले हलवत असतानाच चमचा , चमचा तुप घालवे. आणखी घट्टसर होवून भांड्याचा तळ दिसायला लागला की , लगेच रंग , वेलची पावडर, ड्रायफ्रूटस काप घालून , गॅस बंद करावा , तुप लावलेल्या ट्रे / डिश मधे मिश्रण थापावे.तासा भराने वड्या पाडाव्यात .
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.