साऊथ इंडियन शेंगदाणे-टोमॅटोची चटणी
साहित्य : एक वाटी साले काढलेले शेंगदाणे,३-४ लसणीच्या पाकळ्या,दोन टोमॅटो चिरून व फोडी करून,४-५ लाल सुक्या मिरच्या,एक टेबलस्पून तेल,एक छोटा चमचा मोहरी,एक चमचा भिजवलेली उडदाची डाळ,५-६ कढी पत्त्याची पाने,चवीनुसार मीठ.
कृती : सुरवातीला गॅसवर एका फ्रायपॅन मध्ये मध्यम आंचेवर शेंगदाणे व लाल सुक्या मिरचयांचे तुकडे एकत्र भाजायला घ्या. भाजून शेंगदाण्याचा भाजल्याचा खमंग सुवास सुटून रंग ब्राऊन होऊ लागेपर्यंत एकसारखे हलवत राहून भाजणे चालू ठेवा. भाजल्याचा खमंग वास येऊ लागला व रंग बदलला की गॅस बंद करा व थंड होण्यासाठी एका बाजूला ठेवा.
एका पातेल्यात कपभर पाणी उकळवून घेऊन त्यात टोमॅटो ठेवून ते शिजवून घ्या व थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.
उकडलेले टोमॅटो व भाजलेले शेंगदाणे आणि मिरच्या थंड झाल्यावर मिक्सरच्या गाईंडरमधूनत्यात मीठ व लसणाच्या पाकळ्या घालून वाटून पेस्ट बनवून घ्या आणि ही चटणीची पेस्ट एका बाउलमध्ये काढून ठेवा.
आता शेवटी या चटणीला साऊथ इंडियन तडका दिला की झाली आपली चटणी तयार. या तडक्यासाठी गॅसवर एका काढल्यात तेल गरम करा. तेल पुरेसे तापले की त्यात मोहरी टाकून ती चांगली तडतडली की त्यात भिजवलेली उदादाची डाळ घालून ती शिजवून घ्या,मग त्यात कढीपत्त्याची पाने चुरुन टाका व दोन मिनिटे परतून घ्या व ही तडका फोडणी चटनिवर घालून चमच्याने चटणी ढवळून मिक्स करून घ्या.
गरम इडली,डोसे किंवा उत्तपम यांच्या सोबत ही स्वादिष्ट चटणी सर्व्ह करा.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.