ओल्या हळदीचा तक्कू
ओली हळद स्वच्छ घुवून घ्यावी.सालकाढीने साल काढून जाडसर किस करावा.
त्यात तिखट, मीठ, भाजलेल्या मेथीदाण्याची पुड, हिंग व लिंबाचा रस घालावा.(पाव की.हळदीसाठी ३ मोठ्या लिंबाचा रस)
व्यवस्थित मिसळून काचेच्या बरणीत ठेवावे.
जर तेल घालावयाचे असेल तर २ मोठे चमचे तेल कडकडीत गरम करावे त्यात हिंग घालावा व थंड झाल्यावर तक्कूत मिसळावे.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.