Monday, January 15, 2018

Archus Kobi Muthiya

Source - WhatsApp


कोबी मुठिया

साहित्य : दोन वाट्या किसलेला कोबी , दीड वाटी ज्वारीचे पीठ,अर्धी वाटी बेसन पीठ , एक वाटी दही, अर्धी मूठ कोथिंबीर , दोन चमचे लिंबाचा रस , एक चमचा प्रत्येकी आले,लसूण व हिरव्या मिरचीची पेस्ट , चवीनुसार मीठ , चवीपुरती साखर , फोडणीसाठी एक टेबलस्पून तेल , हळद , मोहरी , जिरे ,हिंग व कढीपत्त्याची पाने
कृती :  एका परातीत किसलेला कोबी व मुठियासाठी वर दिलेले इतर साहित्य एकत्र करून मळून घ्यावे व दहा मिनिटे मुरल्यावर त्याचे छोटे छोटे गोळे करून मुठीत दाबून मुठियाचा आकार द्यावा व एका चाळणीत ठेवून वाफवून घ्यावेत . गॅसवर एका फ्राय पॅनमध्ये फोडणीसाठी तेल तापवून मोहरी, जिरे, हळद , हिंग व कढीपत्त्याची पाने घालून फोडणी करून घेऊन त्यात हे वाफावलेले कोबीचे मुठिया परतून घ्यावेत व गरम मुठियावर कोथिंबीर पेरून सर्व्ह करावेत.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.