मग दुपटी पेक्षा थोड्या कमी पाण्यात किमान 5- 6 तास भिजवायचा
पण साधारण 2 तासांनंतर तो फुगतो तेव्हा छान हलवून फुलवायचा ( let it soak in some air as well ) दोन - तीन मिनीटं
जर तेव्हा थोडा ओलसरपणा किंवा चिकटपणा जाणवला तर मग साबुदाण्याला झाकण न ठेवता थोडावेळ उघडंच ठेवायचं - ऊन असेल तर ऊन्हात किंवा पंख्याखाली भांड ठेवायचं 10 मिनीट पर्यंत
मग साबुदाणा अजून छान 3-4 तास भिजू द्यायचा
दाणे खरपूस भाजायचे - मी आधी धुवून सुकवून घेते म्हणजे सगळे preservatives , धूळ निघून जातात , दाण्याचं कूट करताना मी सालासकटच करते
दाणे भाजत आले की त्यात भरपूर जिरं आणि हिरव्या मिरच्या पण घालते थोडंसं गरम करायला . हे सगळं जरा बेताचं गार झालं की मिक्सर मधे मीठ पण घालून कूट करायचं
मग हे मिश्रण मस्त भिजलेल्या साबूदाण्याला लावयचं आणि पुन्हा त्याला फुलवायचं.
मग काचेच्या भांड्यात घालायचं खोवलेला नारळ आणि कोथिंबीर पण घालायची
Microwave on high heat for 2 mins
परतायचं बाहेर काढून
जर साबुदाणा पुरेसा शिजला असेल तर 1 मि परत MO
Or else for 2 Mins.
नंतर परत परतायचं आणि standing time म्हणून 3-4 min झाकून ठेवल्यावर नंतर खायचं
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.