Monday, June 25, 2018
Su's Aleev Ladoo
Su's अळीवाचे लाडू -
साहित्य -
1 नारळाचा चव
अर्धी वाटी अळीव
पाव किलो गूळ
कृती - नारळाच्या पाण्यात / साध्या पाण्यात अळीव भिजवणे . ( ज्या कढईत लाडू करणार त्याच कढईत भिजवणे ) थोडे भिजून फुगले की त्यात ओले खोबरे आणि गूळ घालून एकत्र करून गॅसवर ठेवावे. पावडर गूळ पटकन मिक्स होतो. मंद गॅसवर परतत रहावे . गुळाला पाणी सुटते ते जाऊन मोकळे होईल इतपत परतावे . थंड झाले की वळायचे . तूप घालायची गरज नाही . घालायचे असल्यास गॅसवर मिश्रण ठेवल्यावर चमचाभरच घालावे .
अळीव जितके तेवढेच पाणी भिजवायला घ्यायचे .
2/4 दिवसात संपवायचे . नाहीतर फ्रिझमध्ये ठेवावे . जेवढा नारळ त्याच्या निम्मा गूळ असतो .
कृजुता दिवेकर ने सांगितले आहे , अळीव खा . त्याने त्वचा , केस , नखे उत्तम रहातात.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.