साहित्य भिजवलेला साबुदाणा २वाटी ,मिरची , जीरा ,आला पेस्ट एक चमचा ,मीठ ,साखर जीरा ,चवीनुसार ,कोथांबीर बारीक चिरलेली एक चमचा ,एक मोठा बटाटा उकडलेला कुचकारून ,शेंदण्याचा कूट २ चमचे ,नि तूप किंवा बटर ,अप्पे पात्र ,
कृती -साबुदाणा,कुचकारलेला बटाटा ,कूट,पेस्ट ,मीठ ,साखर,कोथांबीर थोडा जीरा सर्व एकजीव करणे नि छोटे गोळे तयार करून ठेवणे .अप्पे पत्राचे गोल असतील त्याप्रमाणे गोळे तयार करणे ,पात्र माध्यम आचेवर गरम करून त्यात बटर किंवा तूप थोडं घालून त्यात हे गोळे घालणे नि झाकण ठेवणे मग झाकण काढून त्याला चमच्याने दुसऱ्या बाजूने भाजणे नि परत थोडा बटर किंवा तूप घालणे नि ती बाजू करून घेणे .
छान फुलतात नि खमंग होतात ,खोबऱ्याची चटणी किंवा गोड़ दह्याबरोबर खायला देणे
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.