Tuesday, July 11, 2017

Sakha's Bombil Ambat Tikhat

कोथींबीर आलं लसूण हिरवी मिरची चांगलं वाटून घेणे
एका भांड्यात चिंच भिजवून त्याचा कोहोल करून घ्यावा

एका भांड्यात बोंबील /मांदेली घ्यावेत (साफ केलेले)
त्याला वरचे हिरवे वाटण भरपूर लावून घ्यावे
त्यात अंदाजे 4 चमचे लाल तिखट घ्यावे अंदाजाने.
त्यात चिंचेचा कोहोल घालावे
मीठ घालावे
हे सारे हाताने माशाला लावून घ्यावे
ग्रेव्ही होईल असे त्यात पाणी घालावे
गॅस वर कढई ठेवा
तेल घ्या त्यात लसूण पाकळी ची फोडणी घालावी लसूण तशी भरपूर लागते लसूण लाल झाली की
त्यात ती ग्रेव्ही लावलेले मासे मिश्रण घालावे
ते मिश्रण एक चांगली उकळी फुटली कि
(पाच मिनिटे) बोंबील सारखा मासा शिजू देणे

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.