Friday, December 15, 2017

Archus Chawli Masala

चवळी मसाला

साहित्य: पाव किलो चवळी रात्रभर पाण्यात भिजवत ठेवा , एक मोठा बारीक चिरलेला कांदा, एका मोठ्या वांग्याचे काप ,एका मोठया बटाट्याचा कीस किंवा काप ,३ ते ४ चमचे गोडा काळा मसाला, अर्धा चमचा हळद ,
अक्खा मसाला :
दोन मसाला वेलदोडे , ३ ते ४ लवंग , एक चक्री फुल ,दोन तमालपत्र
वाटण : अर्धी सुक्या गोटा खोबर्यालची भाजलेली वाटी , २ ते ३ पाकळ्या लसूण , २ ते ३ हिरव्या मिरच्या , मूठभर चिरलेली कोथिंबीर , अर्धा चमचा जिरे , अर्धा तुकडा आलं हे सगळे मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या
कृती:
तीन ते चार टेबलस्पून  तेल गरम करून घ्या , त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा लालसर होईपर्यंत परतवा त्याच वेळी अक्खा मसाला सुद्धा परतवून घ्या . आता या मध्ये भिजवलेली चवळी टाकून त्यावर गोडा काळा मसाला ,हळद वर दिलेल्या प्रमाणात टाकावा. याच बरोबर तयार वाटण आणि किसलेला बटाटा किंवा बटाट्याचे काप आणि वांग्याचे काप टाकावेत . रसासाठी हवे तेव्हढे पाणी टाकून सर्व मिश्रण एकजीव करावे आणि चवीनुसार मीठ टाकावे.
कुकरला लावून २ ते ३ शिट्ट्या घ्याव्यात.
मस्तपैकी गरमा गरम चवळी मसाला तय्यार  !

Source - Whatsapp

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.