Friday, December 15, 2017

Neets Coriander Cubes

Su made these coriander cubes!



कोथिंबिरीचे क्यूब्स..
आजकाल ह्या दिवसात कोथिंबीर भरपूर मिळते.. आणि स्वस्त ही असते.. पण कितीही निवडून पेपरमध्ये, कापडात गुंडाळून ठेवली तरी लगेच खराब होते.. त्यावर एक उपाय..
कोथिंबीर आणून, निवडून, छान धुवून घ्यावी.. त्यानंतर ती बारीक चिरून घ्यावी.. आणि आपल्या घरी  ice tray असतो त्यात अर्धा अर्धा cube भरावी आणि वरून स्वच्छ पाणी टाकावं..( बर्फ करतो तेव्हढं) आणि फ्रीझरला ठेवावं.. कोथिंबिरीचे छान cubes तयार होतील.. नंतर ते air tight container मध्ये भरून फ्रीझरला ठेवावेत..
आयत्यावेळी रस्याच्या भाजीत (कोथिंबिरी ऐवजी) आपल्या आवडीप्रमाणे 1 किंवा 2 cube टाकावेत..  गारनिशिंग पण होतं आणि कोथिंबिरीची चव ही भाजीला येते..
टीप:- ह्याप्रमाणेच आपल्याला टोमॅटो cubes, लिंबूपाणी cubesही करता येतात..
Coffee cubes ही करतात..

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.