Tuesday, December 19, 2017

Archus Kobicha Zunka

Source - Whatsapp
कोबीचा झुणका

साहित्य : एक वाटी बेसन पीठ व एक वाटी पाणी (मिक्स करावे, गुठळ्या मोडून घ्याव्यात)
तीन टेबलस्पून तेल,फोडणीसाठी एक छोटा चमचा मोहोरी, एक छोटा चमचा हिंग, एक छोटा चमचा
हळद , ७-८ लसूण पाकळ्या(जाडसर चिरून) , एक मोठा कांदा(बारीक चिरून) , चवीनुसार ३-४ हिरव्या मिरच्या (मध्यम तिखट) व मीठ , एक वाटी चिरलेला कोबी
कृती : बेसन पिठाचे मिश्रण तयार ठेवा. त्यात मीठ घालून चव पहा.
गॅसवर कढईत तेल गरम करून घेऊन त्यात जाडसर चिरलेली लसूण घालून लालसर परतावी. नंतर
मोहोरी, हिंग, हळद,हिरव्या मिरच्या आणि चिरलेला कांदा घालून कांदा लालसर होईस्तोवर परतावे.
कांदा छान परतला गेला की त्यात चिरलेला कोबी घालावा. १५-२० सेकंद परतावे. आच मंद करून भिजवलेले बेसन घालावे. सारखे ढवळावे. गुठळ्या होवू देऊ नयेत.
कढईवर झाकण ठेवून बेसन मंद आचेवर शिजू द्यावे. मधूनमधुन ढवळावे म्हणजे करपणार नाही. साधारण ५-८ मिनिटात झुणका तयार होईल. शिजलेला झुणका रंगा वरूनच  लगेच कळून येईल.
गरम झुणका भाकरी किंवा पोळीबरोबर वाढावा.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.