साहित्य : एक वाटीभर किसलेली ओली हळद , १० ते १२ मेथी दाणे , चवीनुसार ६ ते ७ हिरव्या मिरच्या
एका लिंबाचा रस , एक टेबलस्पून किसलेले आले , एक चमचा कुटलेली व फेटलेली लाल मोहरी,
लोणच्याला द्यायच्या फोडणीसाठी : एक टेबलस्पून तेल, अर्धा चमचा लाल मोहरी, अर्धा चमचा हिंग
कृती : गॅसवर एका छोट्याशा कढल्यात तेल गरम करावे. त्यात मेथीचे दाणे तळून घेऊन बाजूला काढून ठेवावेत.
मग त्याच तेलात मोहरी घालून ती चांगली तडतडल्यावर , हिंग घालून तडका फोडणी तयार करावी. ही फोडणी दुसर्या एका भांड्यात काढून घ्यावी व थंड / गार होवू द्यावी.
ओली हळद स्वच्छ धुवून घेऊन सोलावी व किसून घ्यावी. हिरव्या मिरच्या बारीक चिरून व ठेचून घ्याव्यात. तळलेले मेथी दाणे कुटून घ्यावे.
एका बाउलमध्ये किसलेली ओली हळद, किसलेले आले, लिंबाचा रस, हिरव्या मिरच्यांचा ठेचा , मिठ, कुटलेली व फेटलेली मोहरी, कुटलेले मेथी दाणे असे सर्व एकत्र करावे. थंड केलेली फोडणी यामध्ये घालून निट मिक्स करावे.
हे लोणचे लगेच खायला घेतले तरी चालते. तसेच हवाबंद बरणीत १५ दिवस फ्रिजमध्ये सहज टिकते.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.