Monday, January 15, 2018

Swav's Tasty Chicken

Swav's Tasty chicken - Simple recipe; But many ingredients.

वाटणासाठी
आले, लसूण, कांदा, लाल मिरची, धने, जिरे, शहाजिरे, लवंग, दालचिनी,  तमालपत्र, हे सगळं बारीक वाटून घ्यायचं.

चिकनचे 1 इंच किंवा अजून छोटे तुकडे मी आज केले पण अक्खं ब्रेस्ट पण वापरता येतं

चिकनला हळद आणि दही + वाटण लावून 30 mins ठेवून द्यायचं.

आज लोखंडाच्या कढईत केलं पण non-stick pan or steel pan मधे पण बनवता येतं.

चिकन शिजवण्या आधी

कढईत वाटणाचं उरलेलं पाणी पहिलं तापवून घेतलं

त्यात फोडणी केल्यासारखं जिरे, बडीशेप, लसूण पाकळ्यांचे तुकडे आणि कोल्हापुरी चटणी घातली.

 ( को. चटणी नसेल तर अंबारी इ. चा तयार कांदा लसूण मसाला पण मस्त वापरता येतो )

हे छान उकळल्यावर त्यात टोमॅटो, Bell Peppers घालून सारखं केलं.

लगेचच चिकनचे तुकडे घालून थोडा वेळ परतलं.

मग चिकन शिजत आल्यावर मीठ घालून वरती पुदिन्याची पानं घातली. हे एकत्र केल्यावर 4-5 मिनीटं अगदी मंद आचेवर शिजत ठेवलं.

आच बंद केल्यानंतर आरामात 10-15 मिनीटांनंतर खायला घेतलं

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.